पैठण, (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पैठण शहरातील रंगारहट्टी येथील पुनम मुरलीधरराव साबळे सावंत यांना मराठी विषयात पीएच.डी. प्रदान केली आहे.
कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. रामचंद्र झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मराठवाड्यातील वारकरी संत परंपरेचे साहित्यः एक अभ्यास या विषयावरती शोध प्रबंध विद्यापीठास सादर केला होता.
त्यास विद्यापीठाने मान्यता देवून त्यांना पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांची मौखिक परीक्षा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बहिस्थः परिक्षक म्हणून सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे उपस्थित होते.
पुनम साबळे यांचे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. दासू वैद्य, डॉ. प्रतिभा अहिरे, मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवाजी हुसे, मार्गदर्शक डॉ. रामचंद्र झाडे, प्रीतम सावंत यांनी अभिनंदन केले.










